मोठी बातमी : ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर

मार्च 10, 2023 11:34 AM

manohar patil jamner jpg webp webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातीळ ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील हे समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोहर पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. तर आज मुंबईत मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

Advertisements

डॉ. मनोहर पाटील शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. १९९० साली शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून पाटील यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. येत्या काळात १९९५ साली निवडणुकीत जामनेरची जागा शिवसेनेकडून भाजपने घेतली.आणि भूसावळची भाजपची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे डॉ. मनोहर पाटील यांची संधी कायमची हुकली. मात्र पाटील नेहेमीच एकनिष्ठ शिवसैनिक राहिले आणि त्यांच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now