जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । राज्यात राजकीय उलथा पालक करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. शिंदे फडणवीस सरकारने यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. तेरा दिवस उलटले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना खात काही मिळालेल नाही.
अशातच अजित पवार यांच्या गटातील मंत्रांना लवकरच खात मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांना अन्न नागरी पुरवठा खाते मिळणार आहे असे म्हटले जात आहे.
अजित पवार यांना अर्थमंत्री पद, छगन भुजबळ यांना कृषीमंत्री पद, दिलीप वळसे पाटील यांना सहकारमंत्री पद, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्रीपद, आदिती तटतके यांना महिला बालकल्याण मंत्रीपद, संजय बनसोडे यांना क्रीडा मंत्रीपद, हसनमुश्रीफ यांना अल्पसंख्यांक मंत्रीपद आणि धर्मराव अत्रम यांना परिवहन मंत्रीपद मिळू शकण्याची चर्चा आहे.
ब्रेकिंग
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 14, 2023
अजित पवार गटाला मिळणारी खाती
अर्थ – अजित पवार
कृषी- छगन भुजबळ
सहकार- दिलीप वळसे पाटील
परिवहन- धर्मराव अत्राम
सामाजिक न्याय – धनंजय मुंडे
अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील
महिला बाल कल्याण – अदिती तटकरे
क्रीडा – संजय बनसोडे
अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ