---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर , वाचा कधी होणार?

jalgaon zp
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कित्येक इच्छुक निराश झाले आहेत. (jalgaon zilha parishad election posponded)

jalgaon zp

एप्रिल-मे महिन्यात किंवा थेट पावसाळ्यानंतरच आता निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुका लांबण्याचे कारण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असला तरी इतरही राजकीय कारणेअसल्याचे म्हटले जात आहे. (zp election २०२३ )

---Advertisement---

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या कार्यकाळाची मुदत संपून आता १० महिने पूर्ण झाले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेवर सद्यस्थितीत प्रशासकराज आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. दरम्यान, जून २०२२ जि.प. व पंचायत समितीसाठी गट-गणांची रचना जाहीर होऊन, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडतदेखील आहे.

गत वर्षी पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नसल्याचे कारण देत निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा फेब्रुवारी- मार्च महिन्यात निवडणुका होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात निवडणुका होत नाही, त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर निवडणुका होतात की काय? अश्या चर्चा आहेत.

जि.प. पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा होतील. याबाबत राजकीय आणि प्रशासकीय मंडळींमध्ये मत प्रवाह आहेत. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात असा एक मतप्रवाह आहे तर काहींच्या मते जि.प. निवडणुका या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---