⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठी बातमी : उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मै ; याठिकाणी लागले फलक

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गेल्या पाच दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये जाऊन थांबले आहेत. पाच दिवस झाले तरी कोणताही तोडगा निघत नसून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आता ग्रामीण भागातही पक्षाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवत आहेत. मात्र आता राष्ट्र्रावादी काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे.

चांदोरी ता. निफाड येथील जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी औरंगाबाद महामार्गावर उद्धव ठाकरे यांना पाठींबा देणारा फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अधिकृत भूमिका अद्याप पुढे आली नाही. तरीही राष्ट्रवादीच्या सिद्धार्थ वनारसे यांनी मात्र उघड भूमिका घेतल्याने त्यांचा फलक चर्चेचा विषय आहे विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक केंद्र बिंदू होते आताही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले. त्यात शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत.

फ्लेक्सवर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बोलका फोटो आहे. कार्यकर्त्यांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून लावले गेलेलं हे फलक म्हणजे महाविकास आघाडी किती भक्कम आहे याचं एक उदाहरण आहे. असे म्हटले जात आहे. काही आमदार जरी फुटले असले तरी कार्यकर्ते शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे एकसंघ आहेत उभे आहेत. असे म्हटले जात आहे.