---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात २३ पशुधनाचा ‘लंम्पी स्किन’मुळे मृत्यू!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२२ | संपूर्ण देशात जनावरांना होणाऱ्या लंम्पी स्किन आजाराने हाहाकार उडवला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर लंम्पी स्किन आजार पशुधनाला होत आहे. अशावेळी प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 575 गुरांना लंम्पी स्किनची बाधा झाली आहे. ही बाधा दूर करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्यामुळे जिल्हा प्रशासन जलद गतीने लसीकरणावर भर देत आहे. अशावेळी आतापर्यंत जवळजवळ १ लाख ३०० जनावरांचे लसीकरण करून झाले आहे. तर आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये 23 गुरांचा लंम्पी स्किन आजारामुळे मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात बळीराजा आधीच ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झाला आहे. त्यात शेतमाल विक्री होत नसल्याने बळीराजा अजून त्रस्त आहे. अशावेळी पशुधनाला होत असलेल्या या रोगामुळे बळीराजा अजूनच चिंतीत जरा आहे. यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणावर या रोगाचे लसीकरण होईल अशी आशा बळीराजा करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---