---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, २२ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात पशुधन चोरीच्या घटनेत वाढ झाली असून दररोज कुठे ना कुठे घटना घडत असतात. एलसीबीच्या पथकाने जळगाव, मालेगाव, पाळधी, धुळे येथील ७ जणांची टोळी निष्पन्न करीत ३ जणांना जेरबंद केले आहे. टोळीकडून २२ गुन्ह्यांची कबुली मिळाली असून २ स्कॉर्पिओसह मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

IMG 20221216 WA0051 jpg webp webp

जळगाव जिल्ह्यात गुरे चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. चोरट्यांचा शोधार्थ किसनराव नजनपाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेका राजेश मेढे, पोहेको अशरफ शेख, पोहेकॉ / संदीप सावळे, पोहेका/संदीप पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदर, पोहेको/ अकरम शेख, पोहेका महेश महाजन, पोना/संतोष मायकल, पोना/ नंदलाल पाटील, पोना/ भगवान पाटील, पोना/ हेमंत पाटील, पोको ईश्वर पाटील, पोकों/ उमेश गोसावी, पोको हेमंत पाटील, पोकी/ लोकेश माळी, चापोहेको/भारत पाटील, चापोको दर्शन ढाकणे, चापोना/ अशोक पाटील, सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे तपास पथक तयार केले होते.

---Advertisement---

एलसीबी निरीक्षकांना गुप्त माहिती मिळाली की, पाळधी ता. धरणगाव येथील मोहंमद फयाज मोहमंद अयाज हा गुन्हे चोरीचा मुख्य आरोपी असून तो जळगाव शहरात अंजिठा चौफुली परिसरात त्याची महेंद्र स्कॉपीयो चारचाकी वाहन क्रमांक एमएच.१२.बीव्ही.९४१५ मध्ये दिसून आला आहे. माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळे पथक तयार करुन गुप्तबातमी प्रमाणे वाहनाचा शोध घेता एचपी पेट्रोल पंपासमोर धनराज डेकोरेटर समोर स्कॉर्पिओ उभी होती व गाडीच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघडून ड्रायव्हर सीटवर एक इसम बसलेला दिसून आल्याने त्यास पथकाने वाहनासह ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोहमंद फयाज मोहमंद अयाज वय २४ रा.कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद जळगाव, नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, जाफर गुलाब नवी रा. कसाईवाडी पाळधी ता. धरणगाव, हारुन ऊर्फ बाली शहा पुर्ण नाव माहित नाही रा. बारा फत्तर जवळ धुळे ता. जि. धुळे, अरशद पुर्ण नाव माहित नाही, बालीचा साला रा. बारा फत्तर जवळ धुळे ता.जि.धुळे, मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा. सुरेशदादा नगर कुसूंबा ता. जळगाव अशांनी मिळून गुरे चोरी केल्याची माहीती दिली. निरीक्षकांनी लागलीच तपास पथक पाठवुन निष्पन्न आरोपींचा शोध घेतला असता आरोपी वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रानिया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद मालेगांव ह.मु. मासुमवाडी जळगाव, नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव, असे मिळून आल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपीतांना विचारपुस करता त्यांनी जिल्ह्यात १९ व बाहेर ३ असे एकूण २२ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---