---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

मोठी बातमी : जळगावातील एक गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहरातील राहुल रामचंद्र बऱ्हाटे वय ३३ रा. रावेश्वर कॉलनी याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. जळगाव शहरातील एम.आय.डी.सी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला राहुल बऱ्हाटेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, गैर कायद्याची मंडळी जमवुन दंगल घडवणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, जिवेठार मारण्याची धमकी देणे असे एकुण ९ गुन्हे दाखल असून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच त्याला यापूर्वी मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे २ वर्ष हद्दपार देखील करण्यात आलेले होते.

jalgaon crime 2 jpg webp webp

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेल्या राहुल रामचंद्र बऱ्हाटे वय ३३ याच्या विरुद्ध जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, दंगल घडविणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, व जिवे मारण्याची धमकी देणे अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.

---Advertisement---

दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्यांचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी त्यांचे विरुद्ध चौकशी पूर्ण करुन दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस अधिक्षक जळगांव यांचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी जळगांव यांचे कडे तो प्रस्ताव पाठविलेला होता.

जळगांव जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशाने राहुल रामचंद्र ब-हाटे यास एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप शिकारे याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विनोद बोरसे, पोलीस नाईक योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोना गणेश शिरसाळे, पोकॉ विशाल कोळी तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी यांनी त्याला ताब्यात घेतले. पथकाने आज दि.१७ रोजी राहुल ब-हाटे यास ताब्यात घेत त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---