---Advertisement---
जळगाव शहर जळगाव जिल्हा

मोठी बातमी ! जिल्हयातील ४५० अंगणवाड्या चालतात इमारती विना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या भागातील अंगणवाड्यांना खूप महत्व असते. कारण ग्रामीण भागातील शिक्षणाची सुरुवात याच अंगणवाड्यांमधून होत असते. मात्र जळगाव जिल्हयाचा विचार केला तर एक वाईट बाब म्हणजे जळगाव जिल्हयातील जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत (anganvadi without building marathi news)

jalgaon zp

अधिक प्राप्त माहिती अशी कि, जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४२ अंगणवाड्या आहेत. ज्यातील ३५ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत आहेत. तर जवळपास ४५० अंगणवाड्यांना इमारती नाहीत पर्यायी या सर्व अंगणवाड्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असून शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या ठिकाणी य अंगणवाह्या भरवल्या जात आहेत. (anganvadi without building in jalgaon )

---Advertisement---

जिल्ह्यात स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्या ३ हजार २४२ आहेत. जिल्हाभरात एकूण नव्याने २८९ अंगणवाड्याच्या बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी २६३ अंगणवाड्याचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाभरातील अंगणवाड्यामध्ये ८१ पर्यवेक्षिका काम करीत आहेत. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचे कामकाज चालते. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना आरोग्य विभागाची सेवेचेही काही कामकाज करावे लागतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---