⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार केली आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. सर्व सरकारी बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच, ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.