---Advertisement---
राष्ट्रीय

पेट्रोल-डिझेलनंतर खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या किती घसरले दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून दिलासा दिला होता. त्यानंतर आता खाद्य तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले. अनेक ठिकाणी 20, 18, 10, 7 रुपयांपर्यंतची घसरण नोंदवण्यात आली आहे. पाम, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि सर्व प्रमुख तेलांमध्ये घट झाली आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली अशी घसरण हा दिलासा देणारा आहे.

oil

किमती किती घसरल्या?

---Advertisement---

पामतेलात इतकी घसरण

दिल्लीतील किरकोळ बाजारात पामतेल – 6 रुपये प्रति लिटर

अलीगढमध्ये पाम तेल – 18 रुपये प्रति लिटर

मेघालयात पाम तेल – 10 रुपये प्रति लिटर

तामिळनाडूमध्ये पामतेल – 5 ते 7 रुपये प्रति लिटर

खोबरेल तेलाच्या किमतीत इतकी घसरण

दिल्लीत – 7 रुपये प्रति लिटर

मध्य प्रदेशात – 10 रुपये प्रति लिटर

मेघालयात – 10 रुपये प्रति लिटर

तामिळनाडूमध्ये – 10 रुपये प्रति लिटर

अलिगडमध्ये – 5 रुपये प्रति लिटर

सोयाबीन तेलाचे भाव इतके घसरले आहेत

दिल्लीत – 5 रुपये प्रति लिटर

लुधियाना आणि अलीगढमध्ये – 5 रुपये प्रति लिटर

छत्तीसगडमध्ये – 11 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रात – 5 ते 7 रुपये प्रति लिटर

सूर्यफूल तेलाचे भावही घसरले

दिल्लीत – 10 रुपये प्रति लिटर

ओडिशात – 5 रुपये प्रति लिटर

मेघालयमध्ये, कमाल किंमत प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी कमी झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---