⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठा निर्णय : माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबातील उमेदवाराला टीईटीमध्ये सवलत

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी त्यांचे व कुटुंबीयातील उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. नोव्हेंबर-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेस व यापुढे घेण्यात येणा या शिक्षक पात्रता परीक्षांना ही सवलत लागू राहणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक, संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विमुक्त व भटक्या जमातील इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी ५ टक्के गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.

पदे राहत होते रिक्त
शासन निर्णयानुसार माजी सैनिक व शहीद सैनिकांचे कुटुंबीय यांना १५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले आहे. माजी सैनिकांना २० वर्षांची सेवा केल्यानंतर त्यांच्या वयाचा विचार करता इतर उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आरक्षणांतर्गत पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहतात.

४५ टक्के गन आवश्यक
देशातील इतर राज्यांनी माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांच्या कुटुबीयांना शिक्षक भरतीमध्ये गुणांची सवलत दिली आहे., आता महाराष्ट्र शासनानेसुद्धा माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यास मान्यता दिली आहे.,या गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.,

खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के गुण आवश्यक.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमातील, इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत.