⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | वाणिज्य | आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात, आताचे नवीन दर पहा..

आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात, आताचे नवीन दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात खाद्यतेलाचे प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेलं होते. मात्र मागील काही महिण्यापासून घसरण झाल्याने दिलासा मिळताना दिसत आहे.

अशातच सर्वसामान्यांना आणखी एक दिलासादायक बातमी आहे. पुढील आठवड्यापासून खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. त्यामुळे लोकांना मोठा फायदा होणार आहे. मदर डेअरीने ‘धारा’ ब्रँड अंतर्गत विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) कमी केली आहे.

प्रथमच सोने इतके महागले, नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लीक करा

मदर डेअरीने खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) 15 ते 20 रुपये प्रति लिटरने कमी केली आहे. जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती घसरत असताना कंपनीने हे पाऊल उचलले आहे. किंमत कपात तत्काळ प्रभावाने लागू आहे. नवीन एमआरपीसह धारा तेल पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अन्न मंत्रालयाने सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) या खाद्यतेल उद्योग संस्थांना स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “धारा खाद्यतेलाच्या किमती 15 ते 20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. सोयाबीन तेल, तांदळाच्या कोंडा तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेल अशा विविध प्रकारांमध्ये ही कपात करण्यात आली आहे.

दर कपातीनंतर धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (एक लिटर पॅक) किंमत 170 रुपयांवरून 150 रुपयांवर आली आहे. धारा रिफाइन्ड राइस ब्रानची किंमत 190 रुपयांवरून 170 रुपये प्रति लिटरवर आली आहे. धारा शुद्ध सूर्यफूल तेलाची किंमत 175 रुपयांवरून 160 रुपये प्रति लिटरवर आली आहे. तसेच शेंगदाणा तेलाचा दर २५५ रुपयांवरून २४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.