⁠ 
शुक्रवार, मार्च 1, 2024

महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! या बड्या नेत्याचा राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । 8 फेब्रुवारी 2024 । आगामी निवडणूक तोंडावर आली असता काँग्रेसला एकामागोमाग झटके बसताना दिसत आहे. अशातच काँग्रेसला महाराष्ट्रात आणखी एक मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे.

बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार अखेर बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आता १० फेब्रुवारी रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहे.

दरम्यान, काही काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेले मुंबईतील बडे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. यानंतर आता बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात जाणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा झटका बनला जात आहे.