⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | बिग ब्रेकिंग : बोदवडला एटीएम फोडले ; ३१ लाख लंपास

बिग ब्रेकिंग : बोदवडला एटीएम फोडले ; ३१ लाख लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । धुळे जिल्ह्यातील फागणेसह कापडणे येथे एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच बोदवड शहरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे. हि घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याने सराईत चोरटे हरीयाणा भागातून आल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री चोरी झाल्यानंतरही मुख्यालयाला (सर्व्हरला) संदेश गेला का नाही ? शिवाय गजबजलेल्या भागात चोरी होत असताना पोलिस प्रशासनाची गस्त का झाली नाही ? असा देखील प्रश्न आहेत.आता यावर नक्की काय कारवाई होते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

पोलिस यंत्रणेची घटनास्थळी धाव
एटीएम फोडण्यात आल्याची घटना कळताच बोदवडचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकार्‍यांनी धाव घेतली तसेच जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली.त्यांचा तपस सुरु आहे.

३१ लाख लंपास
यावेळी सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारत चोरट्यांनी हि चोरी केली. यावेळी चोरट्यांनी ३१ लाख रुपये लंपास केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह