जळगाव लाईव्ह न्यूज । 19 एप्रिल 2023 । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातलीच एक महत्वाची घटना म्हणजे सुप्रीम कोर्टात सुरु असलेला राज्याच्या सत्तासंघर्षाचा खटला. मात्र त्या आधीच शिंदे सरकारला एक मोठा झटका बसला आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो असे चित्र सध्या पहिला मिळत आहे. हा निकाल लागला रे लागला कि राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असे चित्र आहे. मात्र त्या आधीच आता एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने शिंदे सरकारला मोठा झटका दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे शिवसेनेची राज्यात चांगलीच घोडदौड सुरु असल्याचे निदर्शस येत आहे. अनेक कार्यकर्ते शिंदे यांच्या सोबत येत आहेत. याचबरोबर राज्यात विकासकामांना गती दिली जात असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
यातच एकनाथ शिंदे सरकारच्या या भूमिके विरोधात आमदार रवींद्र वायकर (ठाकरे गट) यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली.