जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । जामनेर पोलिसांनी काल रविवारी अवैध धंद्यावर धडक कारवाई केली. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले, यात सुमारे ४ लाख २८ हजार ५० रुपयांचे गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ठ करण्यात आले.
जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे चाळीसगांव परीमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे पाचोरा भाग पाचोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे सोबत पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते व पोलीस स्टॉफसह अवैध दारू धंद्यांवर कारवाई केली. दरम्यान, सुमारे 4,28,050/- रूपये ( चार लाख अठ्ठाविस हजार पन्नास रूपयांचा ) गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ठ करण्यात आले. सदर धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलीसांच्या कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये पोलीसांबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
यांच्यावर कारवाई
विकास रमेश खामकर रा.बजरंगपुरा जामनेर, रामकृष्ण सोनू भिल रा.गारखेडा ता.जामनेर, भरत दामु भिल रा.गारखेडा ता.जामनेर, दिपक नथ्थु ठाकरे रा.गारखेडा ता.जामनेर, रमेश सखाराम भिल रा.हिंगणे बु ता.जामनेर, आत्माराम तुळशीराम पवार रा.गाडेगांव ता.जामनेर, शिवलाल किसन गायकवाड रा.करमाड ता.जामनेर, बाबुलाल किसन गायकवाड रा.करमाड ता.जामनेर, रविंद्र रंगनाथ सुरवाडे रा.शहापुर ता.जामनेर, विमलबाई रामदास भिल रा.शहापुर ता.जामनेर, ईश्वर मकडू भिल रा.खडकी ता.जामने, ज्ञानेश्वर शांताराम राठोड रा.कापुसवाडी ता.जामनेर, हरदास जगदेव बेलदार रा.कापुसवाडी ता.जामनेर, सोपान अशोक कोळी रा.कापुसवाडी ता.जामनेर, धनसिंग धिरसिंग राठोड रा.कापुसवाडी ता.जामनेर अशांवर कारवाई कारवाई करण्यात आली.