भुसावळ शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । जळगाव क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती, भुसावळ व बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत तालुक्यातील बारा शाळेतील ७० ते ८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन बियाणी मिलिटरी स्कूलच्या संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, भुसावळ तालुक्यातील क्रीडा समन्वयक बी.एन.पाटील, भुसावळ तालुका कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोरे, सहसचिव संजय बाविस्कर, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, महात्मा गांधीच्या उपप्राचार्य रूपा कुलकर्णी, राजू कुलकर्णी, बोरसे, आयुब, कोळी, जफर यांच्यासह सर्व पंच खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते.
पंच म्हणून संजय बाविस्कर, अकबर पैलवान, शुभम खरारे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी हिंमत पाटील व बियाणी मिलिटरी स्कूल स्टॉप व खेळाडूंनी सहकार्य केल्याचे तालुका समन्वयक बी.एन.पाटील यांनी कळवले.