⁠ 
बुधवार, मे 1, 2024

महिनाभरात भुसावळ-पाचोरा थर्ड रेल्वे लाईन होणार सुरु, ताशी ९० किलोमीटर वेगात धावणार मालगाड्या!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । जळगाव-पाचोरा दरम्यान टाकण्यात आलेल्या तिसर्‍या रेल्वे लाईनीची पाहणी नुकतीच मुख्य संरक्षा आयुक्त मनोज अरोरा व अन्य अधिकार्‍यांनी दोन दिवसात पूर्ण केली. या लाईनीवरून डिझेल इंजिन लावलेल्या मालगाड्या ताशी ९०किलोमीटच्या वेगात रेल्वे प्रशासन चालवू शकते, काही किरकोळ त्रृटी आहे, त्या पूर्ण झाल्यावर साधारण महिनाभराने तिसर्‍या लाईनीचा उपयोग करता येणार आहे. महिनाभरात रेल्वे मार्ग होणार खुला

भुसावळ जंक्शनपासून संरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी तिसर्‍या लाईनीची पाहणी गुरूवार, शुक्रवारी केली. यावेळी जळगावापासून अधिकारी हे सहा मोटर ट्रॉली गाडीने प्रत्यक्ष रेल्वे रूळांची पहाणी व पूलांची पाहणी केली होती. शुक्रवारी अंतीम पहाणी करून त्यांनी कामाच्या बाबतीत काही सूचना केल्या आहे, त्या सूचनानुसार दुरूस्तीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांच्या पाहणी दरम्यान काही निरीक्षणांची नोंद करून त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्यात. शुक्रवारी पाचोरा ते जळगाव या दरम्यान सात डब्यांची शेष गाडी डिझेल इंजीन लावून ताशी १२०च्या वेगात चालविण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. यावेळी भुसावळ ते पाचोरा या मार्गाची पाहणी करून या मार्गावरून ताशी ९०वेगात डिझेल इंजीन लावून मालगाड्या चालविण्याच्या सूचना केल्या.. शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यत या मार्गाचे निरीक्षण करण्यात आले.

जळगाव पाचोरा तिसरी लाईन पूर्ण झाली असून त्यावरील चाचणी सुध्दा यशस्वी झशली असल्याने आता या मार्गावरून मालगाड्या चालविण्यास काही हरकत नाही, मात्र ही गाडी चालवितांना तिचा वेग हा ९०च्या वर जाता कामा नये अश्या सक्त सूचना करण्यात आले. यामुळे भुसावळ येथून मुंबंईकडे जाणारी मालगाडी ही पाचोरापर्यंत तिसर्‍या लाईनीवरून धावू शकणार आहे. यामुळे मुख्य लाईनीवरून धावणार्‍या प्रवासी गाड्यांना आता ट्रॅफिक जामचा फटका बसणार नाही.

पाचोरा ते जळगाव विशेष गाडीने विंडो निरीक्षण करतांना (गाडीच्या शेवटच्या डब्याला मागून असलेल्या काचेतून पहाणी) गाडीने जेव्हा ताशी १२०चा वेगावर पोचली त्यावेळी निरीक्षण करणार्‍या अधिकार्‍यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यत केला. तिसर्‍या लाईनीचे काम चांगले झाले असल्यावर चर्चा करण्यात आली.