जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । जिल्हा अंमली पदार्थांचे हब होते की काय? अशी परिस्थिती असताना भुसावळात तब्बल ३ कंटेनर भरून गुटखा पकडला आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या माहितीनुसार त्यांचे पथक व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
जळगावात अन्य राज्यांमधून भुसावळ, रावेर, चाळीसगावमार्गे मोठ्या प्रमाणात गुटखा येत असतो. या आधी देखील चाळीसगावात अशा प्रकारे वाहतूक करणार्या गुटख्यांनी भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असली तरी हा प्रकार अद्यापही थांबलेला नाही. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या माहितीवरून पथक भुसावळात पोहचले. भुसावळ येथे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाला सोबत घेत त्यांनी सहकार्यांचे एक पथक तयार केले.
सोमनाथ वाघचौरे यांनी स्वत: पथकासह भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी केली. या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असलेले दिसले. या वेळी पोलीस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.
दरम्यान, तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करून जमा केले आहेत. या गुटखा नेमका कुणाचा याचा शोध सुरु आहे. भुसावळ पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून त्यांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
हे देखील वाचा :
- चोपड्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक