भुसावळ

भुसावळातील तापमानात घसरण, वातावरणात पुन्हा गारवा निर्माण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा सलग मारा सुरू असून अजून दोन चक्रवातांचा अंदाज असल्याने पुढील आठवड्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे. भुसावळ शहरात गेल्या आठवड्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा तापमानात घसरण झाली आहे. यामुळे आता वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

भुसावळ शहराचे कमाल तापमान बुधवारी (दि.९) ३४.९ अंशावर तर किमान तापमान १७.३ अंशांवर होते. मात्र पुन्हा पश्चिमी विक्षोभामुळे किमान तापमानात ४.६ अंशांनी कमी झाले आहे. तर कमाल तापमान आता ०.९ अंशांवर घटले असून ३३.८ अंशांवर पारा कायम आहे. यामुळे आता वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

शहरात ७ फेब्रुवारीपासून उकाडा जाणवत होता. शहराचे ५ फेब्रुवारीचे किमान तापमान १०.५ अंशांवर होते. तर मंगळवारी ८ रोजी यात वाढ होऊन पारा १३.१ अंशांवर पोहोचला. मात्र एकाच दिवसांत तब्बल ५.२ अंशानी वाढ होऊन बुधवारी किमान तापमान १७.३ अंशांवर पोहोचले. यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागेल असे वाटत असतानाच शुक्रवारपासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे.

शुक्रवारी शहराचे किमान तापमान १३.५ अंश तर किमान तापमान ३३.८ अंशावर घसरले. तर शनिवारी शहराचे किमान तापमान १२.७ अंशावर घसरले. दरम्यान तापमानातील हा बदल अजून तीन ते चार दिवस कायम राहिल. येत्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात किमान २ ते २.५ अशांनी वाढ होईल, असा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. तोपर्यंत शहरात थंडीचा मुक्काम कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर भारतात १३ व १४ फेब्रुवारी तसेच १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पाऊस, बर्फवृष्टी, धुके पडणार असून थंडीत वाढ होईल. रविवारी राज्यात सरासरी किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होऊन थंडी जाणवेल. द. भारतात तामिळनाडूसह केरळमध्ये ५ दिवस तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button