⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळात राजकीय भूकंप : भाजप गटनेत्याचा राजीनामा

भुसावळात राजकीय भूकंप : भाजप गटनेत्याचा राजीनामा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । भुसावळ शहरात मोठा राजकीय भूकंप झाला असून यामागे एकनाथ खडसे असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भुसावळातील पालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते मुन्ना तेली यांनी तडकाफडकी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सन २०१६ मध्ये मुन्ना तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत २५ भाजप, ३ अपक्ष व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असा २९ जणांना गट तयार करून त्यांचे गट नेते म्हणून मुन्ना तेली यांची निवड झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजपमध्ये अनेक गट-तट निर्माण झाले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर भाजपच्या बहुतांश नगरसेवकांच्या कुटुंबीयांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली.

सध्या पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची कामे होत नाहीत, असा आरोप केला जातो. यासर्व परिस्थितीची पार्श्वभूमी मुन्ना तेली यांच्या राजीनाम्याला आहे. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक असलेले तेली शहराच्या राजकारणात १९९६ पासून सक्रिय आहेत. सन १९९६ मध्ये ते प्रथम भाजपच्या तिकिटावर निवडून आले. यानंतर २००१ व २००६ मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झाले. २००३ मध्ये ते उपनगराध्यक्ष व प्रभारी नगराध्यक्ष होते. आता पालिका निवडणुकीला सहा महिने शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिला. यामुळे भाजपसह पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, आता पारिवारिक जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. खासगी कामे वाढल्याने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही.

-मुन्ना तेली

पुढील निवडणुकीत त्यांचा गट एकनाथ खडसे याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीवादीकडून लढणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. येत्या काळात अजून काय काय घडामोडी घडतात हे पाहावे लागेल.

author avatar
Tushar Bhambare