⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन करताय? भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस गाड्यांचे बर्थ रिकामे ; आताच करून घ्या आरक्षण..

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. काही दिवसानंतर दिवाळी हा सण आहे. या काळात शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधीक असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल हाेते. काही गाड्यांचे वेटींग तिकीटही मिळत नाही. गाड्यांना नाे-रूम असल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेते. मात्र अशातच भुसावळ येथून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे बर्थ रिकामे आहे. त्यामुळे तुम्हाला जर गावी जाण्यासाठी अजूनही तिकीट आरक्षित केले नसेल तर आताच करून घ्या.

या गाड्यांना नाे-रूम
पुण्याकडून भुसावळकडे येणारी आझाद हिंद एक्स्प्रेस, झेलम, पुणे-दानापूर एक्स्प्रेस या गाड्यांना दि. १९ ते २४ ऑक्टोबर या काळात नाे-रूम आहे. तर महाराष्ट्रला १९ ते २३ या काळात नाे-रूम आहे. गाेवा एक्स्प्रेस २० ते २३ दरम्यान नाे-रूम, पुणे-नागपूर नाे-रूम तसेच मुंबईकडून येणारी गीतांजली, काशी एक्स्प्रेस, कामायनी या गाड्यांना २० ते २३ या काळात नाे-रूम, पठाणकाेट एक्स्प्रेसला १६५ वेटिंग, पुष्पक एक्स्प्रेस १३३ वेटींग. सूरतकडून येणारी ताप्ती गंगा, नवजीवन या गाड्यांना नाे-रूम, नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस फुल्ल आहे, सचखंडला दि. २१ ते २३ दरम्यान नाे-रूम आहे.

या गाड्यांमध्ये सीट रिकामे
अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दि. १८ आॅक्टाेबरला ३३ सीट रिकामे आहेत, नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १८ व १९ ऑक्टोबरला २० सीट रिकामे आहेत, तर २० नंतर वेटीग तिकीट मिळेल. गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये १७ ऑक्टोबरला ६३ सीट, दानापूर-पुणे या गाडीत १८ ऑक्टोबर १२ सीट, सूरत-भुसावळ एक्स्प्रेसमध्ये दि. १७ ते २० ऑक्टोबर या काळात १८८ सीट, सूरत-भुसावळ एक्स्प्रेस (दुपारची) या गाडीत याच काळात २०० सीट रिकामे आहेत. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये दि. १७ व १८ ऑक्टोबरला ३०० सीट रिकामे आहेत.