जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । गेल्या आठवडाभरापासून विविध मार्गावर जाणाऱ्या सर्वच बसेसला म्हणजेच लालपरीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पन्नास हजाराहून अधिक प्रवासी दररोजला लपरीने प्रवास करत आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतर १ एप्रिलपासून अनेक कर्मचारी कामावर रुजू व्हायला लागले आहेत.
सद्यस्थितीत ३५० वाहक व २५० चालक कामावर रुजू झाले आहेत. तसेच खाजगी मक्तेदार यांच्या 95 वाहकांनही सेवेत रुजू केले आहे. यामुळे प्रत्येक आगारातील कैद्यांची संख्या वाढली असून या फेर यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व आगारातून 52 हजाराहून अधिक प्रवाशांनी लाल्परी मध्ये प्रवास केला. यामुळे महामंडळाला 33 लाखाहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.