जळगाव जिल्हारावेर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजूर रस्त्यांचे खासदार खडसेंच्या हस्ते भूमिपूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मलकापुर तालुक्यातील वाकोडी, खोपोडी, लोणवाडी राज्य मा.२७० या मंजूर रस्त्यांचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार राजेश येकडे, अर्चना काजळे, रमेशसिंग गौर, भावराव काजळे, मुकुंदा जवकार, राहुल तायडे, रामा काकर, धनराज काजळे, नरेश तायडे, बाबुराव बावस्कर, पुरुषोत्तम जाधव, नवल सोळंखे, गणेश पाटील, वैभव काजळे आदी उपस्थित होते.

तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नांदुरा तालुक्यातील राज्य महामार्ग २७७ बुर्टी,काटी रस्ता दर्जोन्नत करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी ३.७२ कोटी निधी मजूर करण्यात आला आहे. यामुळे बुर्टी व काटी ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे.

प्रसंगी आमदार राजेश एकडे, माजी जि.प.सदस्य विलास पाटील, नितीन देशमुख, संतोष दिघे, अजमत मिर्झा, रवींद्र सातव, अब्दुल बसित, अब्दुल मोहसीनोद्दीन, संदिप पाटील, माणिकराव ठाकरे, निंबाजी ठाकरे, ॠषिकेश देशमुख, संतोष दांडगे यांच्यासह कार्यकर्त्ये व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button