⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे ८ ऑक्टोबर रोजी भुलाबाई महोत्सवचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा यामहोत्सवाचे २१ वे वर्ष साजरे होत आहे. कान्ह देशातील लोक संस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वात प्रिय असलेला हा सोहळा रविवार दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी १० ते ६ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. ही स्पर्धा तीन गटात होत असून प्रत्येक गटात १२ ते १५ मुलींची संख्या असते. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येतो मात्र सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिला करतात. अशा गाण्यांना प्राधान्य देवून भुलाबाई महोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे.

भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे गात घरोघरी हिंडायच्या यातून एकमेकींचे नाते आणि एको पावाढण्यास मदत होत असे तर भुलाबाईच्या गाण्यातून एक सशक्त, सुसंस्कृत परिवाराची जडण – घडण करण्यात महिलांना बळ मिळत होते. परंतु आधुनिक युगात हा संवाद लोप पावत आहे आणि या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे. अशास्त्री केंद्रित उत्सवाचे महत्व जाणून केशाव्स्मृतीच्या पुढाकारातून भूलाबाई महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

यानिमित्ताने शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. यात विजेत्यांच्या प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यंदाच्या भुलाबाई महोत्सव प्रमुख म्हणुन सौ. स्वाती फिरके व सहप्रमुख म्हणून सौ. साधना दामले यांची निवड झाली आहे.

यंदाच्या वर्षी भुलाबाई महोत्सवास प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी मायादेवी मंदिर ते छ. संभाजीराजे नाट्यगृह पर्यंत भुलाबाईची पालखी काढण्यात येणार आहे. यामध्ये मुलींचे ढोल पथक, लेझिम पथक, सामाजिक समतेचे संदेश देणारे फलक असतील. भुलाबाई स्पर्धेत संघ नोंदणीसाठी केशवस्मृती मुख्य कार्यालयात (०२५७ २२३६१६६/६९) दि. ३ ऑक्टोबर २०२३ पर्यत संपर्क साधण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.