⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | गुन्हे | BHR लाच प्रकरण: अवसायकाच्या घरातून लाखो रुपयाची रोकड जप्त

BHR लाच प्रकरण: अवसायकाच्या घरातून लाखो रुपयाची रोकड जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, मूळ रा. गांधीनगर, नागपूर)यांच्यासह वसुली अधिकार्‍याला दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. दरम्यान, नाशिक एसीबीच्या पथकाने अटकेत असलेल्या अवसायक चैतन्य नासरे याच्या फ्लॅटची झडती घेऊन १ लाख ८० हजारांची रोकड जप्त केल्याचे एसीबीचे निरीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले

तक्रारदार कर्जदाराने घेतलेल्या २२ लाख कर्ज परतफेडीत ओटीएस योजना लागू करण्यासाठी दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अवसायक चैतन्य नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटीलविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एसीबीने बुधवारी सुनील पाटील याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून ८.१२ लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी दोघांना न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

अद्याप तपासणी बाकी नासरे याने ओटीएस योजना राबवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आतापर्यंत ५० कर्जदारांना त्याचा लाभ दिला आहे. त्यांच्याकडूनही लाच घेतली आहे का?, सुनील पाटील याच्या ड्रॉवरमधील ८.१२ लाखांची रोकड कोणाकडून आली. तालुका निबंधकांचा अतिरिक्त पदभार असलेल्या नासरेंनी तेथेही कोणाकोणाकडून लाच घेतली. नासरे व सुनील पाटील यांनी किती अपसंपदा बैंक लॉकरमध्ये ठेवली आहे आणि जमीन, प्लॉट, शेअर्समध्ये गुंतवली आहे. त्यांना भेट देणाऱ्यांच्या रजिस्टरची पडताळणी आदींची तपासणी एसीबीला करणे बाकी आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.