---Advertisement---
जळगाव शहर

बहिणाबाई महोत्सवाचे भालचंद्र पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२३ । भरारी फाउंडेशनतर्फे येत्या १९ जानेवारी पासून आयोजित करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी सायंकाळी भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

bhumipujan jpg webp webp

सागर पार्क येथे आयोजित भूमीपूजनाच्या कार्यक्रमात जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या यंदाच्या ८व्या वर्षाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उद्योगपती रजनीकांत कोठारी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प विशेषतज्ञ संजय पवार, नितीन चौबे, अर्चना जाधव, गायत्री परदेशी, शैला चौधरी, हर्षाली चौधरी, हेतल पाटील, विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, अरविंद पाटील, नंदू बारी, सचिन मुसळे आदी उपस्थित होते.

---Advertisement---

महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून खान्देशातील खाद्य परंपरा तसे सांस्कृतिक चळवळीला चालना देणार्‍या या महोत्सवात भारुड, लावणी या लोककलेसोबत मराठी संस्कृतीचा फॅशन शो यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रंगणार आहे तसेच २६० महिला बचत गटांनी याठिकाणी स्टॉल आरक्षित केलेले आहेत दि. १९ पासून महिलांसाठी कुकरी शो, रांगोळी स्पर्धा व शाळा, महाविद्यालयातील ५५० स्पर्धक कलावंत महोत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत आहेत, १९ ते २३ जानेवारी पर्यंत महोत्सव मनोरंजनासाठी खुला असेल, असे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---