जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव शहराला सुवर्णनगरी म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजेच जळगावातील सराफा बाजार. सुभाष चौकाला लागूनच मोठा बाजार देखील भरतो. सराफ बाजाराच्या मध्यभागी श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे. १९२१ च्या काळात आता वास्तव्यास असलेल्या मंदिराच्या जागेवर शेंदूर लावलेला बाणा अस्तित्वाला होता. पुढे सराफ व्यापाऱ्यांनी निधी उभारून सागवानी लाकडाचे मंदिर उभारण्यात आले. जळगाव शहरात एकमेव असे मंदिर आहे कि त्या मंदिराच्या नवरात्रोस्तवानिमित्त सराफ बाजार, सुभाष चौक, चौबे शाळा परिसरात भव्य जत्रा भरत असते.
बाणमागे झाड आणि झाडामागे मारुतीची मूर्ती
सराफ बाजाराच्या मध्यभागी असलेल्या एका बाणामागे झाड होते आणि त्या झाडामागे मारुतीची मूर्ती होती. १९२४ मध्ये सराफ व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधण्याचा निर्धार केला व त्यामागचे कारण देखील तितकेच रोचक होतं. सराफ व्यापारी मुंबईला सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जात असत व तेव्हा त्यांना मुंबादेवीचे दर्शन घडत असे आणि त्याच प्रकारे जळगावात देखील असे मंदिर उभारलं जावं हेच भक्तिभाव मनात ठेवून हे मंदिर बांधण्याचा निर्धार पक्का झाला. सुभाष चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती ही जयपूरहून मागवण्यात आलेली असून हे मंदिर सुभाष चौकाच्या भवानी पेठेत बांधले गेले आहे.
तेव्हा जमविले होते १४ हजार ६५७ रुपये १२ आणे
तर त्या काळात या मंदिराला उभारण्यासाठी किती निधी लागला असेल हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडणार? मंदिरातील ताम्रपटावर करण्यात आलेल्या उल्लेखानुसार मंदिर बांधण्यासाठी १४ हजार ६५७ रुपये आणि १२ आणे एवढा निधी गोळा करण्यात आला आहे. मंदिरात काळ्या दगडाचा ओटा बांधला असून सागवानी लाकडाचे मंदिर बांधले गेले.
सराफ बाजारात प्रत्येक व्यक्ती होतो नतमस्तक
सराफ बाजारात किंवा मोठ्या बाजारात येणारा प्रत्येक व्यक्त, लहानमुल असो किंवा वृद्ध नागरिक असो मंदिराजवळ आल्यावर काही क्षण नतमस्तक होऊन महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊनच आपली पुढली वाटचाल करतात. सोबतच सराफ बाजार म्हणजे सुवर्णनगरी. जळगाव जिल्ह्यात अनेक गावाहुन लोक खरेदी करण्यासाठी येत असतात आणि त्याच निमित्ताने त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सराफ बाजारात आल्यानंतर त्यांना दर्शन होतं ते महालक्ष्मी मंदिराच. बाहेरगावहून आलेले नागरिक आवर्जून मंदिराच्या आत जाऊन महालक्ष्मी मातेच दर्शन घेतात.
नवरात्रीत भरते भव्य जत्रा
आता जळगावात श्रीमहालक्ष्मी मंदिर म्हणून वास्तव्यास असलेल्या मंदिराला नागरिक मात्र भवानी माता मंदिर म्हणून ओळखतात तर हीच मंदिराची खरी ओळख देखील आहे. येते श्रीमहालक्ष्मी देवीची सेवा करण्यासाठी पंडित महेश कुमार त्रिपाठी हे पुजारी आहेत. नवरात्रीचे नऊ दिवस मंदिरावर रोषणाई केली जाते व मोठा बाजारात देखील नवरात्री भरत असते. रात्रभर अनेक ठिकाणी स्टॉल उघडले असतात. अगदीच गजबजलेला हा बाजार दिसतो. महालक्ष्मी मंदिराच्या मागच्या बाजूला सुभाष चौक मित्र मंडळाच्यावतीने देवी देखील बसवली जाते. श्री महालक्ष्मी मंदिराच्या आजुबाजुचा परिसरातील ग्रामस्थ देखील आपल्या घराच्या शुभकार्याची सुरुवात महालक्ष्मीचे दर्शन घेऊनच करत असतात. येथून जुने जळगाव, शनिपेठ, बळीराम पेठ,रथ चौक, बेंडाळे स्टॉप, चित्रा चौक हे परिसर जवळ असल्यामुळे अनेक नागरिक महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊनच पुढे जात असतात.
मंदिरापर्यंत कसे पोहचणार?
जळगाव शहरातील सराफ बाजारात भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत पोहचण्याचे अनेक मार्ग आहेत जुने जळगाव पासून रथ चौक पोचल्यावर तिथून सुरुवात होते सराफ बाजाराची सराफ बाजाराचा सरळ रास्ता जातो सुभाष चंद्रबोस यांच्या पुतड्याकडे त्याच रस्त्याला श्री महालक्ष्मी मंदिर आहे. पांझरापोर टाकीचा रास्ता देखील येऊन मिळतो रथचौकाला तसेच शनिपेठ, कांचन नगर, बळीराम पेठ, चित्रा चौक, बेंडाळे स्टॉप. मंदिरापासून काहीच अंतरावर आहे.