---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

भरधाव चारचाकी खांबावर धडकली, जखमी मित्राला सोडून चालक तरुणाने काढला पळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील नटवर टॉकीज समोर मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला भरधाव चारचाकीने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या मित्राला तिथेच सोडून चालक मित्राने पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

city accident

शहरातील रेल्वे क्वाटर्समध्ये राहणारे वैभव राजाराम इंगळे वय-२१ हे दि.२९ रोजी मित्र सनी अजय सपकाळे रा.राधाकृष्ण नगर याच्यासोबत पाळधी येथे जेवायला गेले होते. रात्री जेवण करून दोघे चारचाकी क्रमांक एमएच.४३.एजी.१९९९ ने येत असताना रात्री ११.३० च्या सुमारास टॉवर चौकाकडून वळण घेतल्यावर नटवर टॉकीज समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर चारचाकी जोरात धडकली.

---Advertisement---

अपघात इतका भयंकर होता कि गाडीतील दोन्ही एअर बॅग्स उघडल्या आहेत. अपघातात वैभव इंगळे हे जखमी झाले असताना त्यांचा मित्र चालक सनी सपकाळे याने गाडी सोडून पळ काढला. घटनास्थळी लागलीच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हजर झाले आणि त्यांनी जखमी वैभव इंगळेला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी सनी सपकाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक उपनिरीक्षक संजय बडगुजर हे करीत आहे.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp Channel

    Join Now

    google-newsFollow on Google News

    Join Now

    ---Advertisement---