भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती जळगावतील भाजप कार्यालयात साजरी

डिसेंबर 25, 2025 3:18 PM

देशासाठी समर्पण जीवन जगणारे कविराज व्यक्तिमत्व श्रद्धैय अटल जी; आ. सुरेश भोळे

atalvajpayi 1

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२५ । देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची १०१ जयंती आज दि.२५ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी सकाळी १०:३० वा. भाजपा कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी आ. सुरेश भोळे यांनी अटलजीच्या जीवन कार्याविषयी माहिती कार्यकर्त्यांना दिली.

Advertisements

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, जयेश भावसार, ज्येष्ठ पदाधिकारी उदयजी भालेराव, भगत बालाणी, मुकुंद मेटकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. नितूताई परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील उपस्थितीत होते.

Advertisements

कार्यक्रमाप्रसंगी भाजपा पदाधिकारी संजय घुगे यांनी अटलजींच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. यानंतर व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनय बाहेती यांनी ‘मोदी फिल्ड भारत’ या पुस्तकाचे विमोचन आ. सुरेश भोळे यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोर्चा, आघाडी अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस जयेश भावसार यांनी केले व आभार प्रदर्शन मुकुंद मेटकर यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now