⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | भारत फायनान्स कंपनीला मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी ६७ लाखात गंडविले!

भारत फायनान्स कंपनीला मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी ६७ लाखात गंडविले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शहरासह ग्रामीण भागातील गरजूंना हप्त्यांवर कर्ज पुरवठा करणारी भारत फायनान्स इक्लयुजन लिमिटेड कंपनीची मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी तब्बल ६७ लाखात फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने मुक्ताईनगरसह मलकापूर व रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर शाखा व्यस्थापक एकनाथ भीमगीर गोसावी वय ३२, चाळीसगाव यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. भारत फायनान्स कंपनीच्या मुक्ताईनगर शहरातील शाखेत काम करणारे फिल्ड असिस्टंटसह अन्य दोघा कर्मचारी यांनी २४७ महिलांचे अंगठे बायोमेट्रिक पद्धतीने घेतल्याचे भासवत कर्ज वाटप केल्याचे दर्शवत तब्बल ६६ लाख ६६ हजार ९२४ रुपयांची कंपनीची फसवणुक करीत पोबारा केला आहे.

फिल्ड असिस्टंट निखिल राजेंद्र सावकार वय ५४, रा. राज शाळेजवळ, एमडीएस काॅलनी, जळगाव. कर्मचारी अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे रा. रेलगांव फुलंब्री, औरंगाबाद. व पंकज रामधन वानखेडे रा. शेळगाव मुकुंद,ता.चिखली जि.बुलढाणा, असे तिघा संशयित आरोपींचे नाव आहे. या तिघांनी संगनमत करुन दि.१ सप्टेंबर २०२१ ते १५ मे २०२२ या कालावधी दरम्यान मलकापुर, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी, दुईसह इतर गावांतील एकुण २४७ महिला सदस्यांचे अंगठ्यांचे ठसे घेत बायोमेट्रिक पद्धतीने कर्ज मंजुर झाल्याचे भासवत ६६ लाख ६६ हजार ९२४ रुपयांत कंपनीला गंडविले.

दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामीण भागात महिला कर्जधारकांत खळबळ उडालीअसून शाखेकडून पंधरा दिवसांपासून संपुर्ण मिटींगांचे व्हेरीफाय करुन ऑडीट केले जात असल्याची माहीती शाखा व्यवस्थापक एकनाथ गोसावी यांनी ‘जळगाव लाईव्ह न्युज’ च्या प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह