जळगाव जिल्हा
पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी भानुदास पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । युवा क्रांती फौंडेशनतंर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी भानुदास शिवाजी पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा क्रांती फौंडेशन संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी, संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमर बेंद्रे, संचालक तथा राष्ट्रीय कोषा अध्यक्ष गणेश आदमने यांच्या सहमतीने व वैशाली सोलंकी यांच्या शिफारशी वरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.