⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भजनाने होते आत्म्याची शुद्धी : हभप विशालशास्त्री महाराज

भजनाने होते आत्म्याची शुद्धी : हभप विशालशास्त्री महाराज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । दानाने धनाची वृद्धी होते तसेच भजनाने आत्म्याची शुद्धी होते. जिथे धन तिथे विवाद असतो. गृहस्थी करीत असताना पैसा कमवावाच मात्र चांगल्या मार्गाने कमवावे. मेहनतीने कमावलेला पैसा आत्मिक समाधान देतो असे मार्गदर्शन भागवताचार्य हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले.

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे.

कथेच्या दुसऱ्या दिवशी परीक्षित राजाचे उदाहरण देत भागवत कथेची सुरवात करण्यात आली. हभप विशालशास्त्री महाराज म्हणाले की, मनाचे श्लोक मानसशास्त्र शिकवते. त्यामुळे मानसिक शांतता लाभते. भागवतात संस्कृत श्लोकांचे रूपांतर मराठीत करून लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले असल्याचे सांगितले.

यावेळी, ‘देव बाजारातील भाजीपाला नाही हो’, ‘रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी’ ‘गोविंद रे गोपाळ रे’, ‘भक्ती पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी’ अशा भक्तिगीतांवर भाविकांनी ताल धरला. डॉ. चेतन पाटील, जयेश भावसार, मनोज पाटील, अभिजित येवले, उमेश सोनार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

संगीतमय श्रीमद भागवत कथेला भाविकांनी उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह