---Advertisement---
भडगाव

भडगावला अमृत महोत्सवी दीपोत्सव साजरा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । भडगाव येथील भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने अमृत महोत्सवी दीपोत्सव साजरा करत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या सदस्यांनी भडगाव पेठ येथील जिल्हा परिषद शाळा क्र २ येथील विद्यार्थ्यांसोबत दीपोत्सव व भाऊबीज निमित्त खाऊ वाटप करत यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली. यात अमृत महोत्सवाच्या निमित्त ७५ दिवे मुलांच्या हातून प्रज्वलित करून एक सकारात्मक संदेश देत दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुट्टीतही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

jalgaon 2022 10 29T121329.358

सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक चिंचोले सर, उपशिक्षिका दीपमाला शिंपी मॅडम विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. तसेच भारतीय युवा राष्ट्रीय परिषदेच्या राज्य उपाध्यक्षा नेहा मालपुरे, जिल्हा समन्वयक दर्शना गोसावी, तालुका अध्यक्ष मयूर मालपुरे, लोकेश जैन, उपाध्यक्ष चेतन राजपूत, धनंजय पाटील, महासचिव पूजा कासार, कोषाध्यक्ष रिद्धेश वाघ, सचिव प्रतीक्षा सोनवणे, मंदार कासार, पल्लवी पाटील, कल्पेश पाटील, मनीषा पाटील, समन्वयक हर्षल राजपूत, अंजली पाटील, भावेश पाटील, दुर्गेश धनराळे, सौरव बाविस्कर आदी सदस्य उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---