जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । आमदार किशोर पाटील यांचे स्थानिक विकास निधीतुन भडगाव व पाचोरा तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाना 20 लाखाचे साहीत्य वाटप केले जाणार आहे. त्यातील पहील्या टप्प्यात भडगाव तालुक्यात उद्या (ता.24) ला दुपारी 12 वाजता शिवसेना कार्यालयात आमदार कीशोर पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
काही दिवसापुर्वी भडगाव व पाचोरा तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाची आमदार कीशोर पाटील यांच्या वतीने तज्ञ डाॅक्टराकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना आवश्यक असेलेल साहित्य आमदार निधीतून देण्याचे आमदार कीशोर पाटील यांनी दिले होते. त्यानुसार भडगाव तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाना उद्या (ता.२४) शिवसेना कार्यालयात साहीत्याचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणुन माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक प्रतापराव पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, योगेश गंजे समाज कल्याण अधिकारी, दिव्यांग अधिकारी गणेशपूरकर, विकास पाटील, आदि उपस्थीत राहणार आहेत. दिव्यांगाना सायकल, कृत्रिम अवयव, कर्णयंत्र आदि साहीत्य देण्यात येणार आहे.