..अन्यथा तुरुंगात जावे लागेल ; WhatsApp च्या ‘या’ नव्या सिक्रेटपासून राहा सावध
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअॅपवर सतत नवनवीन अपडेट येत राहतात. त्यातच आता व्हॉट्सअॅपने नवं सिक्रेट फिचर्स अपडेट केल आहे.
सध्याच्या डिजिटल युगात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. याच पार्श्वभूमीवर WhatsApp वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता. तसेच अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात जावे लागू शकते. या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर या गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका
वापरकर्त्यांनी WhatsApp वापरताना त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये. वापरकर्त्यांनी त्यांचा पत्ता, फोन नंबर, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड क्रमांक, बँक खात्याची माहिती शेअर करू नये.
अनोळखी अकाउंट ब्लॉक करा
व्हॉट्सअॅपवर अनोळखी अकाउंटवरून (Account) मेसेज येत असतील तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारत असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवे. तसेच व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा. अशावेळी अकाउंट ब्लॉक करणे गरजेचे आहे. व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेटिंग आणि ग्रुप इनव्हाइट सिस्टममध्ये देखील तुम्ही ब्लॉक करु शकता
ग्रुप प्रायव्हसी
ग्रुप प्रायव्हसीच्या मदतीने ठरवू शकता की, तुम्ही कोणला ग्रुपमध्ये अॅड करू शकता आणि कोणाला नाही. अशा परिस्थितीत विनाकारण कोणीही तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही. तुम्हाला ग्रुप चॅटमध्ये काहीतरी चुकीचे वाटल्यास त्याची तक्रार करा आणि ग्रुपमधून बाहेर पडू शकता.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवायला हवे
WhatsApp वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यात टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठेवायला हवे. यामुळे कोणीही तुमचे अकाउंट सहज हॅक करू शकणार नाही. व्हॉट्सअॅप खाते रीसेट आणि पुन्हा वापरण्यासाठी 6 अंकी पिन आवश्यक आहे. यामुळे स्कॅमपासून आपले संरक्षण होईल.