जळगाव लाईव्ह न्यूज । 19 एप्रिल 2023 । दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपिटीचा पाऊस होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.मात्र आता शेतकऱ्याचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहेत.
ती म्हणजे राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यातही वादळ वार्यासह पावसाची शक्यता. राज्यात पुढच्या २४ तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढच्या २४ तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.