---Advertisement---
जळगाव जिल्हा

Jalgaon : बेवारस कारमधून बीपचा आवाज, नागरिकांमध्ये घबराट; बॉम्ब स्कॉडने दार उघडला अन्…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२५ । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात एका बेवारस कारमधून बीपचा आवाज येत असल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि शहर पोलिसांनी तातडीने परिसर रिकामा करत, बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले. मात्र, तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

car bip

सध्या देशभरात युद्धजन्य परिस्थितीचे सावट असताना अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये थोडा जरी आवाज झाला तरी भीतीचे वातावरण आहे. परंतु वाहनातून येणारा बीप आवाज आणि वाहनाची बेवारस स्थितीमुळे सुरक्षा यंत्रणेने तातडीने खबरदारी घेतली. यावेळी बॉम्ब शोध पथकाला तातडीने पाचारण करून बॉम्ब शोध पथकाचे जवान अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयास्पद कारची तपासणी सुरू केली. वेळेचं टिकटिक… बाहेर जमलेल्या लोकांच्या श्वासांची गती वाढली होती. ‘काय निघणार आतून?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात थैमान घालत होता.

---Advertisement---

बॉम्ब शोध पथकाने वाहनाची संपूर्ण तपासणी करून दरवाजा उघडला. पण आत… काहीही नाही! कोणतीही संशयास्पद वस्तू नव्हती. कारमध्ये कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळून न आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहन एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे असून त्या काही कारणास्तव बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांनी वाहन रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये उभी केली होती. विशेष म्हणजे वाहनाच्या पुढील नंबर प्लेटही नव्हती, तर मागील बाजूस एमएच 12 एसएफ 1680 हा क्रमांक आढळून आला. तपासणीनंतर वाहनातून बीपचा आवाज तांत्रिक कारणामुळे येत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वाहनाची कसून तपासणी करण्यात आली.

संबंधित वाहन नो पार्किंगमध्ये उभे केल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली. वाहनामध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य न आढळल्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment