जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । लग्नाचे आमीष दाखवून एका डॉक्टर तरुणीवर ५ वर्षे अत्याचार करणाऱ्या परिचारकाविरोधा जळगाव एमआयडीसी पोलिसात आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संपत लक्ष्मण मल्हाड (मुळ रा. दरिबडची, ता. जत, जि. सांगली) असे परिचारकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानतंर परिचारक संपत बेपत्ता झाला आहे.
याबाबत असे की, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने बीड जिल्ह्यीत राहणाऱ्या एका डॉक्टर तरुणीवर लग्नाचे आमीष देऊन पाच वर्षे अत्याचार केला. विशेष म्हणजे या परिचारकाचे लग्न झाल्यानतंरही तरुणीने विरोध करुन देखील तिला जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनतंर परिचारकाविरोधा जळगाव एमआयडीसी पोलिसात आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पिडीत तरुणी उस्मानाबाद येथे नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली येथे गेली होती. या दरम्यान तीची संपत मल्हाड या तरुणाशी ओळख झाली. त्यावेळी संपत मल्हाड याने तीला लग्नाचे आमीष देत आपल्या जाळ्यात फसविले. लग्नाचे आमिष देत त्याने तीच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानतंर संपतने अनेकवेळा तीच्याकडून पैसे देखील घेतले. दरम्यान, अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तीला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात करवून घेतला. यानंतर मागील वर्षी मार्चमध्ये लग्न केल्यानतंर या पिडीतेने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले.
लग्न झाल्यानतंर देखील संपतने तीच्या गावी जाऊन प्रेमसंबधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन तरुणी त्याच्या सोबत संपर्कात राहत होती. संपत तीला भेटण्यासाठी तगादा लावत होता. सप्टेबर २०२० मध्ये औरंगाबाद येथे बोलावून घेत पुन्हा अत्याचार केले. यानंतर ६ सप्टेबर २०२१ रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावून घेतले. पांडे डेअरी चौकातील मैत्रीणीच्या रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने थेट हात-पाय बांधून तीच्यावर अत्याचार केले. तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर एका खासगी वाहनातून तरुणीस बीड येथे मुळगावी सोडून आला. अखेर वारंवार होणाऱ्या अत्याचारास वैतागलेल्या तरुणीने जळगावात एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार संपतच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच संपतने पळ काढला आहे.