जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । जळगाव येथील आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जळगाव शहरातील १० हजार महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महिलांना प्रशस्तीपत्र आणि निशुल्क आत्मनिर्भर किट वाटप करण्यात आले. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल उचललं गेलं.या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच या सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, सीमाताई भोळे, भारतीताई सोनवणे, रूपाली वाघ, गायत्रीताई राणे, कांचनताई सोनवणे, सौ. रंजनाताई सोनवणे, सौ. रेखाताई वर्मा, अर्चनाताई पाटील यांची उपस्थिती होती. तसेच इतर सहकारी, आयोजक आणि नियोजक, विविध प्रशिक्षक, ब्युटीपार्लर संचालिका व माता भगिनी या देखील मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.