प.वी. पाटील विद्यालयात रंगली सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यावेळी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यात इयत्ता पहिलीच्या गटात कौस्तुभ जयवंत खैरनार, प्रीती प्रकाश मराठे, हर्षदा जयेश अस्वार, इयत्ता दुसरीच्या गटात रुचिता वाल्मीक पाटील, शर्बरी राहुल खैरनार, काव्या आनंदा फेगडे, इयत्ता तिसरीच्या गटात हिमांशू जयंत कोल्हे, संस्कृती दिनेश पाटील, मानवी अरविंद पाटील तर इयत्ता चौथीच्या गटात केतन गिरीश पाटील, हर्शिका दुर्गाप्रसाद चव्हाण, श्रेयस भाऊसाहेब पाटील या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. याप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, कल्पना तायडे, सरला पाटील, धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, अशोक चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी उपस्थित होते.