---Advertisement---
गुन्हे धरणगाव

पाळधी येथे जुन्या वादातून महिलांना बेदम मारहाण, एकाला अटक

paladhi
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दोन महिलांना अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध पाळधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

paladhi

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , २१ मे  रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाळधी येथील हॉटेल हिमालयच्या ओट्यावर बसलेल्या सचिन चौधरी (पूर्ण नाव माहीत नाही ) याने कारण नसताना एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून तू पंजाबी ड्रेस का घातला असे म्हणत तिला लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून गंभीर दुखापत करून पोट, छाती, पाठीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

---Advertisement---

यावेळी मारहाण का करतो म्हणून आलेल्या तक्रारदार दुसऱ्या महिलेस शिवीगाळ करून तिच्या डोक्यावर दांडक्याने वार  करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने तो वार चुकविला असता तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूस आणि बोटाना मार लागला . याबाबत महिलेने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी सचिन चौधरी याच्याविरुद्ध 323,324,307,294,504,506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल अरुण निकुंभ करीत आहे.  गंभीर जखमी महिलेवर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---