जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । भुसावळ शहरातील गांधी नगर भागातील रहिवासी रोमा प्रमोद चौबे यांना जुन्या वादातून तिघांनी बेद मारहाण करीत शिविगाळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
शहरातील बुध्द विहारामागील गांधी नगर भागात गुरुवार, 12 मे रोजी सकाळी 11.30 वाजता रोमा प्रमोद चौबे या त्यांच्या घराच्या बाहेर झाडू मारत असताना संशयीत जाहेद शेख इब्राहीम यांनी चौबे यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिविगाळ करीत अंगावर पाणी फेकले. याचा जाब चौबे यांनी विचारला असता आरोपी खालीद शेख इब्राहीम व जुबेर शेख इब्राहीम (रा.गांधी नगर, भुसावळ) यांनी महिलेचे केस ओढले तसेच तुझा गळा कापून तुला फेकून देईल, अशी धमकी दिली. जाहेद शेख यांनी त्यांच्या हातातील लोखंडी सळईने चौबे यांच्या पायावर व मांडीवर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले. जुबेर यांनी चापटा-बुक्यांनी मारहाण केली. पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार विजय नेरकर हे पुढील तपास करीत आहे.