जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । रेल्वे स्टेशनवर अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने, त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतिच अमळनेर मध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळत दादागिरी करणाऱ्यांची रेल्वे स्टेशनवर तसेच परिसरात मंगळवारी धिंड काढली.
संशयित नासीर शेख आमीर शेख याने रेल्वे स्टेशनवर व्यवसाय करू देत नाही म्हणून, आरपीएफ राजकुमार महाराम जाटव व देवेंद्र जयलाल नेने यांना शिविगाळ करत, काठ्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी धावून आल्याने संशयित पसार झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, श्रीराम पाटील, अमोल पाटील, मधुकर पाटील यांनी संशयिताला पकडले. तसेच ज्या ठिकाणी संशयित दादागिरी करत होता, त्याठिकाणी नेऊन त्यांची धिंड काढण्यात आली.