⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महिलेची कुसुंब्यांत काढली छेड, तरुणाला जळगावात पब्लीक मार

महिलेची कुसुंब्यांत काढली छेड, तरुणाला जळगावात पब्लीक मार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । जळगाव शहराच्या जवळच असलेल्या कुसुंबा येथे घरात घुसून एका तरुणाने विवाहितेची छेड काढली. महिलेने आरडाओरडा करताच त्याने जळगावच्या दिशेने पळ काढला. दोघांनी पाठलाग करीत तरुणाला गोलाणी मार्केटमध्ये पकडून चांगला चोप दिला. यावेळी जनतेने देखील त्याला चांगलाच पब्लीक मार दिला.

पाचोरा येथे राहणारा एक तरुण मार्केटिंगचे काम करतो. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तो कुसुंबा परिसरात फिरत असताना त्याने घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा करताच त्याने घरातून धूम ठोकली आणि थेट रिक्षा गाठून जळगावच्या दिशेने निघाला. महिलेने तिच्या पतीला सांगताच पतीसह एक नातेवाईक असे दोघे जळगावच्या दिशेने रिक्षात निघाले.

छेड काढणारा तरुण गोलाणी मार्केटजवळ उतरून जिन्याने तिसऱ्या माळ्यावर पळाला. महिलेच्या पतीने त्याला गाठले आणि जाब विचारला. संताप अनावर झाल्याने छेड काढणाऱ्याला चांगलाच चोप दिला. गोलाणीत नागरिकांची गर्दी झाल्याने बघ्यांनी देखील त्याला चांगलाच पब्लीक मार दिला. घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी धाव घेतली. दोघांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.