जिल्हाभरातील बालरोग तज्ज्ञांची उपस्थिती ; ३१ शिष्टमंडळांचा सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२४ । इंडियन अॅकेडमी ऑफ पेडीयाट्रीक, नॅशनल निओनेटॉलॉजी फोरम अंतर्गत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे प्रशिक्षकांसाठी आयोजित बेसिक एनआरपी कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत बालरोग उपचारावर मंथन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. जागृती निकम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, पेडीयाट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माजीद खान, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, प्रा. डॉ. गिरीश राणे, नांदेडचे डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीवार, गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणवीर, कार्यशाळेच्या समन्वयीका डॉ. प्रियदर्शनी मून आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेत ३१ शिष्टमंडळ सहभागी
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे प्रशिक्षकांसाठी आयोजित बेसिक एनआरपी कार्यशाळेत जिल्हाभरातील बालरोग तज्ज्ञांचे ३१ शिष्टमंडळ सहभागी झाले होते. कार्यशाळेत नवजात शिशुंवर होणार्या आपत्कालीन उपचारासंबंधीचे मंथन करण्यात आले. तसेच डॉ. प्रियदर्शनी मून यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल वैद्यकीय महाविद्यालय व गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जाव्या अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयीका डॉ. प्रियदर्शनी मून यांनी तर आभार बालरोग विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांनी मानले.