---Advertisement---
जळगाव जिल्हा चाळीसगाव

बापरे : जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

---Advertisement---

badtya jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव मालेगांव रस्त्यावर असलेल्या कळवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. वनविभागाने या घटनेला दूजोरा दिला आहे. गुरुवारी सकाळी वाहनाने जाणाऱ्या प्रवाश्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

---Advertisement---

सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याचं दिसून आलं आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या शेतात, कधी गावच्या वाड्यावस्तीतही बिबट्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे, गावकऱ्यांसह वन विभागाचीही मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आता, पुन्हा एकदा अशाच मानवी वस्तीत जात असताना वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे.

मालेगाव वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जात आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---