जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । रात्री ७.५० वाजेला १२६१७ मंगला एक्स्प्रेस (Mangala Express) जळगावच्या दिशेने येत होती. प्रवासात एका वृद्ध महिलेने वरील बाजूच्या बर्थवरून खाली उतरताना हँडल समजून अनवधानाने धोक्याचा इशारा देणारी साखळी खेचली. यामुळे अवघ्या काही मिनिटांत धावती गाडी थांबली. यानंतर नेमके काय झाले? हे पाहण्यासाठी कर्मचारी धावाधाव करत संबंधित बोगीत आले. मात्र, मला वाटले बर्थवरून खाली उतरण्यासाठी येथे हँडल लावले आहे, असे उत्तर महिलेने दिल्यावर कर्मचाऱ्यांनी डोक्याला हात मारला. या सर्व प्रकरणात गाडीचा २० मिनिटे खोळंबा झाला.
मंगळवारी नाशिक वरून सायंकाळी ५ वाजता डाऊन मंगला एक्स्प्रेस (Mangala Express) १२६१७ जळगावकडे निघाली. त्यात भुसावळला जाण्यासाठी काही महिला नाशिक येथून सर्वसाधारण बोगी क्रमांक डी.२ मध्ये बसल्या होत्या. रात्री ७.५० वाजता ही गाडी जळगाव शहरापासून काही अंतरावर होती. त्यामुळे जळगावनंतर लगेच भुसावळ येईल. तेव्हा गर्दीमुळे गैरसोय नको म्हणून बोगीत वरील बर्थवर बसलेली महिला खाली उतरत होती. यावेळी हँडल समजून त्यांनी धोक्याचा इशारा देणाऱ्या साखळीचा आधार घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यात साखळी ओढली जावून काही वेळात लगेच गाडी थांबली. गाडी का थांबली हे शोधण्यासाठी ज्या डब्यात (डी.२) साखळी ओढली गेले तेथे जावून रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी संबंधित महिलेने, मला बर्थवरून खाली उतरायचे होते. खाली उतरण्यासाठी हँडल असावे म्हणून मी साखळीला धरून खाली उतरल्याचे सांगितले. या प्रकाराने झालेल्या मनस्तापाबद्दल ती अनभिज्ञ होती. तरीही नियमानुसार कर्मचाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी महिलेला वरिष्ठांकडे नेले. भुसावळ स्थानकावर कारवाई झाली. मात्र, यामुळे मंगला एक्स्प्रेस गाडीचा २० मिनिटे खोळंबा झाला.
नवीन कोचमध्ये आधुनिक पद्धतीची साखळी लावली आहे. ही साखळी वरील बर्थच्या शेजारी असून हँडल सारखी डिझाइन आहे. या साखळी-पासून काही अंतरावर साखळी संबंधी सूचना लिहिली असते. त्यामुळे ती आपत्कालीन प्रसंगी ओढावयाची धोक्याची साखळी आहे, ही माहिती मिळत नाही. प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे या डिझाइनमध्ये बदल गरजेचा आहे.
मंगला एक्सप्रेसमध्ये महिलेने धोक्याची साखळी ओढल्यानंतर महिलेची चौकशी करताना रेल्वे कर्मचारी. या घटनेमुळे प्रवाशांचा वेळ वाया गेला. काही गाड्यांना इगतपुरीत थांबा