dharangaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । मुबंई येथे घर घेण्यासाठी पैशांची मागणी करुन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सासरकडच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीना भावलाल शिंदे (रा. रोटवद, ता. धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुबंई येथे घर घेण्यासाठी पैशांची मागणी करुन शिवीगाळ, मारहान करत शाररीक व मानसिक त्रास दिला. सासु, सासरे जेठ, ननंद व सासरचे परिवारातील लोकांनी मुलबाळ होत नाही, म्हणून देखील छळ करत होते. या प्रकरणी पती भावलाल रामदास शिंदे, सासू वचलाबाई रामदास शिंदे, सासरे रामदास शिंदे, रा. उल्हास नगर मुंबई, विमलबाई (सासऱ्याची बहिण), जेठ साहेबराव रामदास शिंदे, त्यांचा मुलगा सुमित साहेबराव शिंदे (रा. एरंडोल), नणंद मीनाबाई आतामाराम सोनवणे, नंदोई आत्माराम सोनवने, त्यांचा मुलगा अक्षय आत्माराम सोनवणे )रा.उल्हास नगर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. अरूण निकुंभ हे करीत आहेत.