जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता याच दरम्यान, भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील भरवस्तीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. हा प्रकार बॅंक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील भररस्त्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची शाखा आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहीले जाते. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. परंतू चोरट्यांचा चोरी करण्याचा डाव अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले.
दरम्यान, हा सर्व प्रकार बँक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.